Close Menu
sfmaharashtraexpress.insfmaharashtraexpress.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

एनआयपीएम पश्चिम प्रादेशिक परिषद २०२६ मध्ये धैर्यशील देसाई यांना “उत्कृष्ट एचआर उद्योजक पुरस्कार ” प्रदान

October 13, 2026

जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार; विखे-शिंदे दुरावा चव्हाट्यावर!

October 5, 2026

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
sfmaharashtraexpress.insfmaharashtraexpress.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
sfmaharashtraexpress.insfmaharashtraexpress.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
You are at:Home»पिंपरी चिंचवड»दिशा समितीच्या बैठकीत महापौर रवि लांडगे यांनी मांडले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे महत्त्वपूर्ण प्रश्न*
पिंपरी चिंचवड

दिशा समितीच्या बैठकीत महापौर रवि लांडगे यांनी मांडले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे महत्त्वपूर्ण प्रश्न*

Sfmaharashtraexpresseditor@gmail.comBy [email protected]September 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link
Spread the love

चाकण–निगडी मेट्रोत आळंदी स्थानक, इंद्रायणी प्रदूषण नियंत्रण आणि पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत केंद्र शासनाच्या सहकार्याची विनंती

पिंपरी, दि. ९ सप्टेंबर २०२६ : पुणे येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दिशा समितीच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्न प्राधान्याने मांडले. शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, नदी प्रदूषण आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर आवश्यक सहकार्य व पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी केली.

प्रस्तावित चाकण–निगडी मेट्रो मार्गिकेमध्ये आळंदी स्थानकाचा समावेश करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी महापौर लांडगे यांनी बैठकीत केली. आळंदीचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व तसेच या परिसरात येणाऱ्या भाविकांची संख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज विचारात घेऊन मेट्रोची सुविधा आळंदीला उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यासह केंद्र शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी मा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी केली. दिशा समितीसमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार भक्ती शक्ती–मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–वल्लभनगर–चाकण ही ४५.२९ कि.मी. लांबीची प्रस्तावित मेट्रो मार्गिका असून त्यामध्ये ३४ स्थानकांचा प्रस्ताव आहे.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही महापौर लांडगे यांनी गांभीर्याने उपस्थित केला. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी नदीक्षेत्राशी संबंधित सर्व महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय यंत्रणा व संबंधित प्राधिकरणांनी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याऐवजी परस्पर समन्वयातून ठोस आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. प्रदूषणाची कारणे निश्चित करून सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण आणि नदी संवर्धनाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली.

तसेच, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता महापौरांनी अधोरेखित केली. या प्रकल्पाशी संबंधित विविध प्रलंबित बाबींवर सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी आणि पुढील कार्यवाही निश्चित करावी, अशी विनंती त्यांनी केली.

बैठकीत महापौर लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेशी संबंधित विविध केंद्र पुरस्कृत योजना आणि विकासकामांचाही आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, AMRUT 2.0, स्मार्ट सिटी मिशन, पीएम स्वनिधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा तसेच राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम यांसारख्या योजनांशी संबंधित प्रलंबित बाबींना गती देऊन केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून शहराला अधिकाधिक लाभ मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दिशा समितीच्या सादरीकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेशी संबंधित या विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा समावेश करण्यात आला होता.

महापौर रवि लांडगे यांनी मांडलेल्या शहराच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी केंद्र व राज्य शासनाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवून शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे महापौर लांडगे यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
[email protected]
  • Website

Related Posts

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026

पुण्यात बाप्पाला भावपूर्ण निरोप; मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहाची लाट

September 24, 2026

स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम*

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

HDR Photography Blew My Mind. It’s Complicated

January 9, 2020

New Design Concept: Falls Hotel & Spa, North England

January 8, 2020

Check Out the Celebrities From the International Film Festival Awards 2023

January 10, 2020

This Is What Your Lifestyle Will Be Like If You Retire at 55 With $5 Million

January 5, 2020
Don't Miss
उद्योग

एनआयपीएम पश्चिम प्रादेशिक परिषद २०२६ मध्ये धैर्यशील देसाई यांना “उत्कृष्ट एचआर उद्योजक पुरस्कार ” प्रदान

By [email protected]October 13, 2026
Spread the love

सातारा, महाराष्ट्र | १० ऑक्टोबर २०२६ मेगा कॉर्पसोल एलएलपी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.…

जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार; विखे-शिंदे दुरावा चव्हाट्यावर!

October 5, 2026

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026

देवस्थान इनामधारकांचा रविवारी महामेळावा…

September 24, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

SF Maharashtra Express हे महाराष्ट्रातील आणि देशभरातील ताज्या घडामोडींचे विश्वासार्ह डिजिटल वृत्तमाध्यम आहे.

आमचे ध्येय अचूक, निष्पक्ष आणि वेगवान बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणे हे आहे.

राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय आणि स्थानिक बातम्यांचे सर्वसमावेशक कव्हरेज आम्ही देतो.

जनतेच्या समस्या, प्रश्न आणि यशोगाथांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पत्रकारितेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सामाजिक जबाबदारी ही आमची मूलभूत मूल्ये आहेत.

वाचकांना सत्याधारित माहिती देत लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत.

SF Maharashtra Express – सत्याचा वेग, जनतेचा आवाज.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

एनआयपीएम पश्चिम प्रादेशिक परिषद २०२६ मध्ये धैर्यशील देसाई यांना “उत्कृष्ट एचआर उद्योजक पुरस्कार ” प्रदान

October 13, 2026

जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार; विखे-शिंदे दुरावा चव्हाट्यावर!

October 5, 2026

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026
Most Popular

HDR Photography Blew My Mind. It’s Complicated

January 9, 2020

New Design Concept: Falls Hotel & Spa, North England

January 8, 2020

This Is What Your Lifestyle Will Be Like If You Retire at 55 With $5 Million

January 5, 2020
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.